महाडच्या ऐतिहासिक लढ्याची उद्दिष्टपूर्ती तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा विषमतावादी शक्तींना परिघावर लोटून समतावादी शक्ती सामाजिक घडामोडींच्या केंद्रस्थानी येतील
महाड सत्याग्रह ही इतिहासात घडलेली केवळ एक घटना नाही. येणार्या काळावर खोलवर परिणाम करेल असे ते महत्त्वाचे पाऊल आहे. अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर असे एखादे वळण येते, जे पुढची वाटचाल प्रकाशमान करते. हे वळण जसे व्यक्तीच्या प्रयत्नामुळे आलेले असते, तसेच ते त्या काळात विकसित झालेल्या विशिष्ट भौतिक परिस्थितीमुळेसुद्धा शक्य झालेले असते. कोणत्याही सामाजिक क्रांतीला त्या त्या स्थळकाळाचे संदर्भ असतात.......